Wednesday, March 30, 2005

another one ...

Well ... this is another one for a close friend's birthday. I understand that I am writing too much about close friends and their bdays ... but well ... I can do so only because I have such friends I can boast of ...

So here's to Shantanu on his Birthday ...

शंत्या …

तुझा वाढदिवस हा नक्कीच एक खास दिवस असतो ...
ज्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत बसतो.


पण मला एक सांग ना ...
की आपण असे एकाच दिवशी अचानक मोठे होतो का?
आणि बाकी वर्षभर fight मारुनही तितकेच कोवळे रहातो का?


म्हणून आज म्हटलं बघावं मागे की काळ खरंच इतक्या वेगाने पळतो का ...
आपण exactly “तेव्हा” मोठे झालो – असा एक तरी क्षण मिळतो का!


आपल्या आठवणी म्हटलं की मन पार S.P. पर्यंत जाऊ पहातं
त्या एक-एक दिवसाचं चित्र जसंच्या तसं डोळ्यांपुढे उभं रहातं


Lecture ला bunk मारून बघितलेला तो पहिला सिनेमा – “हिमालयपुत्र”
S.P. च्या Reading Room मध्ये जमा होऊन केलेला तो दंगा एकत्र


ते “chemistry ला केम्याच ना रे” असं एकत्र ठरवून class लावतांना
ते रायगडावर अंधारात चूल पेटवून खिचडी करून खातांना


Colleges वेगळी असली तरी F.E.मध्ये केलेला एकत्र अभ्यास
P.L. मध्ये रोज संध्याकाळी पर्वतीवर मारलेल्या गप्पा तासंतास


S.P. समोरची ती कच्छी दाबेली ... S.S. मधला तो वडा-पाव...
Semesterच्या result नंतरचे चेह-यावरचे ते हरवलेले भाव


दर वर्षी बघितलेलं अमोलचं पुरुषोत्तम, तुझं punt-formation
आपला एक जरी plan flop गेला तर येणारं ते frustration ...


तुझ्या oral च्या अदल्या रात्री तुला पहिल्यांदा शिकवलेलं C
थंडीच्या एका भल्यापहाटे कुडकुडत सिंहगडला जायची ती मस्ती


बंगलोरसाठी तुला stationवर सोडून येतांना जड झालेलं पाऊल ...
आपण अजूनही नियमितपणे जातो ते सारसबागेतलं गणपतीचं देऊळ


अनेक वेळा तुला घातलेल्या शिव्या, तुझ्यावर केलेली चिडचिड
गिरीवनला जातांना एकांच गाडीत झालेली सहा जणांची गिचमिड


हे सगळं आठवलं की मन सुध्दा मनातल्या मनात हसतं
आणि वाटतं की वाढदिवस हे दंगा करण्याचं फक्त अजून एक निमित्त असतं


या एक-एका क्षणाचे मनावर कोरलेले आहेत कायमचे ठसे ...
मग मागे बघतांना जाणवतं की आपण मोठे झालो ते हे असे!!!


पण ही तर सुरुवात आहे ...
अजून खूप मोठं व्हायचं आहे, खूप पुढे जायचं आहे ...
तुझ्यापुढे तर दोनच options … B नाहीच शक्य झालं तर मग A आहे


कधीतरी एकदम भीती वाटते – पुढे राहू शकू का रे आपण असंच एकसंगे ...
पण मग DCHची शिकवण आठवते –
हम दोस्त थे … दोस्त हैं … और हमेशा रहेंगे!!!


एकत्र नसतो जर आपण तर असे मोठे झालोच नसतो का …
पण जे कधी होणार नाही त्याबद्दल बोलण्याचा काही फायदा असतो का?


आज इच्छा हीच की हात अजून घट्ट धरुन चालत राहू असंच पुढे ...
आज पुन्हा दर वर्षीप्रमाणे ... wish you many happy returns of today !!!


- you know who