मराठी माणसा जागा हो
अमोल कडून inspiration घेऊन मराठीमध्ये blog करतो आहे. :) जरा अवघड जातं आहे, पण हळूहळू होईल सवय.
सही वाटतं आहे. आपण हल्ली स्वतःच्या कामात इतके व्यस्त असतो की आपण आपल्याच मराठीचा वापर लिहिण्या-वाचण्यासाठी सोडाच पण बोलण्यासाठी सुध्दा घर सोडून इतर ठिकाणी क्वचितच करतो. Chat करतांना सुध्दा आपल्याला बोलायचं असतं मराठीमध्ये पण type करतो english alphabets मध्ये. मराठी मध्ये हाताने काही लिहून तर युगं झाली. आता कागद-पेन घेऊन बसलो तरी कितपत झेपेल शंका वाटते. पण keyboard वर मराठी मध्ये लिहिण्याची ही पध्दत आवडली.
एकदम शाळेत शिकलेलं "अ" ला काना "आ" आठवतंय :) कारण type करण्याचा speed जबरदस्तच आहे :) पण मजा येतेय.